सिनेसृष्टीतील लाडकी फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ कुणाला मिळते याची उत्सुकता शुक्रवारच्या ‘जिओ फिल्मफेअर अॅवॉर्ड्स मराठी 2017’ या रंगारंग सोहळ्यात बघायला मिळाली. सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि दिग्दर्शक यांसारखे एकूण अकरा पुरस्कार मिळवत यंदा ‘सैराट’ने बाजी मारली. मराठी फिल्मफेअरचे यंदाचे हे तिसरे पर्व गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडवर रंगले. पुष्कर श्रोत्री आणि पुष्कराज चिरपुटकर या लोकप्रिय जोडीने खुमासदार सूत्रसंचालनाने या पुरस्कार सोहळ्यात रंगत भरली. त्याचबरोबर सोनाली कुलकर्णीचे ठसकेदार लावणीवरील मॉडर्न बिट्सचे नृत्य, ‘ऑस्कर भारतात आले तर’ यावरचे विडंबनात्मक स्किट, जसराज जोशी-प्रियांका बर्वे यांचा अनोखा संगीतप्रयोग अशा कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच भार्गवी चिरमुले, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, गश्मीर महाजनी आणि गिरीजा जोशी, अभिनय बेर्डे आणि मृण्मयी गोडबोले, वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत, मयुरेश पेम आणि ऋतुजा शिंदे, अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडित यांच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाला चार चांद लावले. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील माधुरी दीक्षित-नेने, दीपिका पदुकोण, अदिती राव हैदरी, जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे या कलाकारांसोबत मराठी सिनेसृष्टीतील नाना पाटेकर, अशोक सराफ, विजू खोटे, सचिन पिळगावकर, हेमांगी कवी, शरद केळकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, मानसी नाईक, पूजा सावंत अशा अनेक कलाकारांनी रेड कार्पेटवर स्वतःची छाप पाडली. या भव्य इव्हेंटचे प्रक्षेपण कलर्स मराठीवर होणार आहे. हे ऋण मी विसरू शकणार
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews